नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी जुन्नर नगरपरिषद, जुन्नर मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत "दिव्यांग सक्षमीकरण अभियान" राबविण्याचे निश्चित झाले आहे.